शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीसाठी अन्य अधिकारीही जबाबदार : प्रकाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:56 IST

कोल्हापूर : आरोग्य विभागा ची औषध खरेदी एकटा जिल्हा आरोग्य अधिकारी करू शकत नाही. औषधनिर्माण अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचीही यामध्ये जबाबदारी येते. तसेच आरोग्य, स्थायी आणि सर्वसाधारण सभेतही त्याची मंजुरी होते. वित्त विभागही यामध्ये येतो. त्यामुळे ही सामूहिक जबाबदारी असल्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील ...

ठळक मुद्दे‘सीईओं’च्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर : आरोग्य विभागाची औषध खरेदी एकटा जिल्हा आरोग्य अधिकारी करू शकत नाही. औषधनिर्माण अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचीही यामध्ये जबाबदारी येते. तसेच आरोग्य, स्थायी आणि सर्वसाधारण सभेतही त्याची मंजुरी होते. वित्त विभागही यामध्ये येतो. त्यामुळे ही सामूहिक जबाबदारी असल्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत सादर केला आहे.

जादा औषध खरेदीबाबत तक्रारी झाल्यानंतर प्राथमिक अहवालाची छाननी करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी डॉ. प्रकाश पाटील आणि औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगुले यांना नोटिसा काढल्या होत्या. चौगुले यांनी सोमवारी (दि. १२) आपला खुलासा सादर केला होता.

मंगळवारी डॉ. प्रकाश पाटील यांनीही आपला खुलासा मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करण्यासाठी टपालामध्ये दिला. बुधवारी तो डॉ. खेमनार यांच्याकडे जाईल. त्यानंतर डॉ. पाटील यांचा हा खुलासा मान्य करायचा की नाही, याचा निर्णय डॉ. खेमनार घेणार आहेत. तसेच पुढील कारवाईची प्रक्रिया काय राहील, हेदेखील यावर ठरणार आहे.याबाबत डॉ. प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा कारभार एकटा अधिकारी पाहू शकत नाही. औषध खरेदी ही शासन दरसूचीनुसार झाली असून, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून जी औषधांची मागणी आली, त्याला अनुसरूनच ही खरेदी करण्यात आली आहे. औषधनिर्माण अधिकारी बी. डी. चौगुले आणि आधीचे व सध्याच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नांद्रेकर व डॉ. उषादेवी कुंभार यांच्यावरही ही जबाबदारी येते.

आम्ही खरेदीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर आरोग्य समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेतून तो मंजूर केला जातो. वित्त विभागाच्या विविध टेबलांवरून हा प्रस्ताव फिरतो आणि मग त्यावर कार्यवाही होते. त्यामुळे या सगळ्यासाठी मी एकटाच जबाबदार कसा? असा प्रश्नच डॉ. पाटील यांनी उपस्थित केला.दोघांनीही  नाकारला घोटाळाडॉ. प्रकाश पाटील आणि बी. डी. चौगुले या दोघांनीही आपले खुलासे दिले आहेत. दोघांनीही घोटाळा झाल्याचे आणि त्यामध्ये आपलीच जबाबदारी असल्याचे नाकारले आहे. अशा परिस्थितीत डॉ. खेमनार या दोघांचा खुलासा मान्य करणार की तो शासनाकडे कारवाईसाठी पाठवणार, याचा निर्णय दोन दिवसांत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmedicineऔषधं